नाशिक जिल्ह्यात ४७ हजार रुग्णांवर होतायेत उपचार; मृतांची संख्या तीन हजार पार

नाशिक जिल्ह्यात ४७ हजार रुग्णांवर होतायेत उपचार; मृतांची संख्या तीन हजार पार

नाशिक| प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत ४६ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १ हजार ७५७, चांदवड १ हजार ६२७, सिन्नर १ हजार ७७६, दिंडोरी १ हजार ४३९, निफाड ३ हजार १७५, देवळा १ हजार २१०, नांदगांव ९२८, येवला ८१३, त्र्यंबकेश्वर ६१०, सुरगाणा ३६३, पेठ २३१, कळवण ७७६, बागलाण १ हजार ५००, इगतपुरी ५३५, मालेगांव ग्रामीण ९४० असे एकूण १७ हजार ६८० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७ हजार ३४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१७ तर जिल्ह्याबाहेरील २२४ असे एकूण ४६ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ८७ हजार ८०५ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८०.७३ टक्के, नाशिक शहरात ८३.४६ टक्के, मालेगाव मध्ये ८१.९४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५८ इतके आहे.

नाशिक ग्रामीण १ हजार ४०९ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३४ व जिल्हा बाहेरील ९५ अशा एकूण ३ हजार १७७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने मृतांची संख्यादेखील वाढते आहे. काल रात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्यात आले असूनही आज सकाळी बाजारात मोठी गर्दी बघावयास मिळाली. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी करोनाची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढताना दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com