ऐकावं ते नवलंच! एकाच कुंडीत लावली शेहचाळीस रोपे; घडते 'एकात्मतेचे दर्शन'

ऐकावं ते नवलंच! एकाच कुंडीत लावली शेहचाळीस रोपे; घडते 'एकात्मतेचे दर्शन'

नवीन नाशिक | वार्ताहर

आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन महाराष्ट्राच्या सर्व संतांनी समता, एकता, बंधूताची शिकवण आपल्याला दिली. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानतून संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना केली आहे .तर संत तुकडोजी नि "या भारतात बंधुभाव नित्य वसु दे "

दे वरचि असा दे "या अभंगात सर्व संप्रदायांचा वर मागितला आहे. माणसामाणसात विविधतेतून एकता भारतात दिसून येते 'तशी ती मनातून असावी हे खरे परंतु वृक्षातूनही विविधतेत एकता दर्शवणारी एकाच कुंडीत शेहचाळीस झाडांची आणि भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारी झाडांची कुंडी म्हसरूळ नाशिक येथील कल्पना कुशारे यांनी साकारून महाराष्ट्र साकारलेला आहे .

त्यांनी लावलेल्या रोपा मधून काही जगतात काही मरतात पुन्हा नवीन लावले जाते हे चक्र सुरूच राहते. या विविध झाडातून महाराष्ट्राचा आकार दर्शवीत त्यांनी आगळे वेगळे दर्शन घडवले आहे .

सेंद्रिय खत घालत त्यांनी झाड डवरले,बहरले असून विविध रोपांना आकार देऊन घरातच महाराष्ट्र देश साकारला आहे .

पती व वडिलांच्या सरकारी नोकरी निमित्त विविध राज्यांमध्ये फिरून विविध प्रदेशातील लोकांशी सलोख्याचे संबंध त्यांनी जोपासले आहेत .

बालपणापासूनच अनेक तेत एकता मनात बिंबलेली असल्यामुळे कुशारे यांनीही सुंदर कुंडी साकारली आहे.

ती कुंडी सौंदर्याची वेळोवेळी आठवण करून देते .अनेक वर्षांपासून विविधतेत एकता दर्शवणारी ही कुंडी आलेल्या गेलेल्यांचे सर्वांचेच आकर्षण ठरते .

ही आहेत रोपे

वड ,चिंच, कांचन ,कोरफड ,राम तुळस ,सब्जा ,ऑफिस टाईम प्लांट ,साँग ऑफ इंडिया,बांबू, पर्पल हार्ट ,चिनी गुलाब, मनी प्लांट ,बखाना ,तगर ,गव्हांकुर, दूर्वा ,क्रोटन पुदिना ,तरोटा ,गोकर्ण, गुळवेल, रिबन ग्रास ,लिंबू ,क्रोटन ,गवती चहा यासह शेहचाळीस विविध वृक्ष कुंडीत लावून त्यांनी त्याचे संगोपन केले आहे. प्रत्येकाने असा महाराष्ट्र मनातून वृक्षातून साकारावा ही अपेक्षा त्यांनी करीत माणसा-माणसात एकतेचे दर्शन घडावे ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com