मोठी कारवाई! जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड

मोठी कारवाई! जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरात तब्बल ४६ ठिकाणी अवैध दारू बनवणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करत दहा लाख रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून संबंधीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ग्रामीण ५०० अधिकारी व अंमलदारांनी नाशिक ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी गावठी दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ४६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून सुमारे दहा लक्ष रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त केली.

मोठी कारवाई! जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड
काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षांबद्दल नेत्यांमध्ये नाराजी; पक्षातील वाद चव्हाट्यावर

या धाडसत्रात जिल्ह्यातील कळवण मधील ११, वाडीवऱ्हेमधील ५, मालेगाव ४, सुरगाणा, घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा व इगतपुरी मधील प्रत्येकी ३, निफाड व पेठमधील तालुका हद्दीतील प्रत्येकी २, सिन्नर, अभोणा, वणी व त्रंबकेश्वर मधील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.

या कारवाई दरम्यान पोलीसांनी अवैध दारु गाळप करणा-या ठिकाणांसोबतच, रसायन बनवण्यासाठी लागणा-या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई करून विशेषत: सटाणा तालुक्यातील ठेंगोडा व देवळा तालुक्यातील लोहणेर गावांतून मोठ्या प्रमाणावर काळा गुळ व नवसागर जप्त केले.

मोठी कारवाई! जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड
New Parliament Inauguration : नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, 'अशी' आहेत नाण्याची वैशिष्ट्ये

या कारवाईत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप जाधव, पुष्कराज सूर्यवंशी, कविता फडतरे, ३१ पोलीस ठाण्याचे  प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचेसह ९ विशेष पथकांनी सहभाग घेतला.

मोठी कारवाई! जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड
Nashik Crime : गायींना इंजेक्शन देऊन करायचे बेशुद्ध अन्...; दोघांना अटक

नाशिक ग्रामीण हद्दीत अवैध व्यवसाय रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी नुकतीच १२ विशेष पथके तयार केली असून त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मोठी कारवाई! जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड
IPL 2023 : मुंबईसमोर गुजरातचे आव्हान, अंतिम फेरीचे तिकीट कुणाला?

अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाइनवर माहीती द्यावी, माहीती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com