जिल्ह्यातील धरणांत ४४ टक्के जलसाठा

गंगापूर धरण ४२ टक्क्यांवर
जिल्ह्यातील धरणांत ४४ टक्के जलसाठा

नाशिक । Nashik

उन्हाचा झळा तीव्र होत असून धरणातील जलसाठा झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २४ धरणांत ४४ टक्के जलसाठा उरला असून पुढील दीड ते दोन महिने या जलसाठ्यावर जिल्हावासियांची तहान भागवावी लागणार आहे.

तर नाशिक शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरण समूहात ४३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे लागणार असल्याने काटकसरिने पाणी वापरावे लागणार आहे.

मागील दोन वर्षापासून शंभर टक्के पाउस पडला. धरणे ‍अोव्हर फ्लो झाल्याने नदी व नाले तुडूंब भरुन वाहत होते. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे नद्यांना पूर आला होत‍ा.

त्यामुळे यंदा उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता कमी जाणवत आहे. मात्र आता एप्रिलचा पंधरवडा लोटला असून उन्हाच्या तीव्र झळा जिल्हावासियांना जाणवत आहे. नदी व नाले आटले असून विहिरिंनी तळ गाठायला सुरुवात केली आहे.

जिल्हातील धरणांत सद्यस्थितीत ४४ टक्के जलसाठा उरला आहे. गतवर्षी हे प्रमाण ५१ टक्के इतके होते. गंगापूर धरण समूहात ४३, पालखेड धरण समुहात ३८ व गिरणा खोरे समूहात ४७ टक्के पाणी शिल्लक आहे.

उन्हाचा झळा तीव्र होत असल्याने पाण्याची मागणीत वाढ झाली असून ग्रामिण भागात टंचाई जाणवायला लागली आहे. मागणी वाढल्याने धरणातील उपलब्ध जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे लागणार आहे.

त्यामुऴे जलसाठा झपाट्याने खालवण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी जूनमध्ये पावसाचे आगमन होते. पण मागील एक दोन वर्षापासून पावसाचे आगमन लांबले असून जुलैमध्ये वरुणराजा हजेरी लावत आहे.

ते बघता उपलब्ध जलसाठ्यावर अडीच महिने जिल्ह्याची तहान भागवावी लागणार असून पाण्याचे काटकसरीने जिल्हाप्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com