नाशिकसाठी ४३ हजार लशी प्राप्त; महापालिकेलाही मिळाल्या १० हजार

नाशिकसाठी ४३ हजार लशी प्राप्त; महापालिकेलाही मिळाल्या १० हजार

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात आज (दि. १५ ) ४३ हजार कोव्हीशील्ड लसीचा साठा प्राप्त झाल्याने लसीकरणाला वेग येणार आहे. यातील नाशिक महापालिकेला १० हजार लस मिळणार आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घालू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे....

गेल्या काही दिवसांपासून कधी लस उपलब्ध होते तर कधी नाही असा खेळ सुरु असतानाच आज जिल्ह्याला ४३ हजार लशी प्राप्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्हाभरात लसीकरण सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर उद्या लस मिळणार आहे.

दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यातील ३१ केंद्रांवर अवघे ५ हजार १८ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ४ हजार १९७ नागरिकांनी पहिला तर ८२१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीण भागातील २५ केंद्रांवर आज लसीकरण झाले.

यात २ हजार ७५४ नागरिकांनी पहिला तर ६०५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर नाशिक महापालिकेच्या तीन केंद्रांवर १ हजार ३४२ नागरिकांनी पहिला तर १२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

तर मालेगाव महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३ केंद्रावर १०१ नागरिकांनी पहिला डोस तर ९४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

नाशिक महापालिकेला १० हजार लसींचे वितरण करण्यात आले असून शुक्रवारी शहरातील ११६ केंद्रांवर प्रत्येकी ८० नागरिकांचे लसीकरण होणार आहे. नागरिकांनी गर्दी न करता लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com