जिल्ह्यात २४ तासात ४२४ नवे करोना रूग्ण

जिल्ह्यात २४ तासात ४२४ नवे करोना रूग्ण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्हात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात ४२४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा १९ हजार ९७४ इतका झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ४२४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील १९२ रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा १३ हजार ४७० वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील १६२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ४ हजार ७६३ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, इगतपुरी, सिन्नर, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगावत पुन्हा करोनाने डोके वर काढले असून आज ६७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार ५६० झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १८१ झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील २१९ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा १४ हजार ८६४ वर पोहचला आहे.

आज करोनामुळे २४ तासात ५ रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये २ नाशिक शहरातील असून ग्रामिण भागातील ३ यांचा सामावेश आहे. करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने ८०४ संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक ५५१ तर ग्रामिण जिल्ह्यातील ११८ आहेत. जिल्हा रूग्णालय ९, मालेगाव २६, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ११ व होम कॉरंटाईन ८९ रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित १९,९७४

नाशिक १३,४७०

मालेगाव १५६०

उर्वरित जिल्हा ४७६३

जिल्हा बाह्य १८१

एकूण मृत्यू ५९७

करोनामुक्त १४,८६४

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com