एकाच दिवसात ४२ लाखांचा कर वसूल

महापालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद
एकाच दिवसात ४२ लाखांचा कर वसूल

नाशिकरोड । Nashik

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाने विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबरला एकाच दिवसात 42 लाखांची विक्रमी वसुली केली.

2020 च्या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील घरमालक तसेच नागरिकांनी महापालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद दिला.

योजनेअंतर्गत मालमत्ता कर थकबाकी आणि चालू बाकी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. वसुली विभागातील अधिकारी आणि सेवक यांनी पाठपुरावा केल्याने आज दिवसभरात मालमत्ता करवसुली आणि पाणी करवसुली असे दोन्ही मिळून 42 लाख 12 हजार 218 इतकी विक्रमी वसुली झाली.

उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मेनकर यांनी करदात्यांचे आभार मानले. तसेच वसुली विभागाचे अभिनंदन केले. या व्याजमाफी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com