मालेगाव दंगलप्रकरणी 42 जणांना अटक

अटकसत्रामुळे संशयितांचे धाबे दणाणले
मालेगाव दंगलप्रकरणी 42 जणांना अटक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शुक्रवारी मालेगाव बंद (malegaon bandh) दरम्यान दगडफेक (stone palting), बसस्थानक (bus stop) तसेच व्यापारी प्रतिष्ठानांची तोडफोड, प्राणघातक हल्ले (Deadly attacks) तसेच जमावबंदी (Curfew) आदेशाचे उल्लंघन आदी विविध आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी (police) अटकसत्र जोरात सुरू केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी काल रात्री 9 जणांना अटक केल्याने दंगल (Riot) प्रकरणात अटक (Arrested) केलेल्यांची संख्या 42 वर पोहचली आहे. काल रात्रीपर्यंत 33 जणांना अटक करण्यात आली होती.

शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत धार्मिक संघटनांबरोबरच (Religious organizations) राजकीय पक्षातील नेते (political leaders) व कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे. वादग्रस्त व्हीडीओ (Controversial video) व्हायरल (viral) करत जातीय व्देष पसरविल्याप्रकरणी यापुर्वीच महागठबंधन आघाडीचे नगरसेवक (Corporator) अय्याज अहमद मोहंमद सुलतान उर्फ अय्याज हलचल यांना पोलिसांनी अटक केली होती.

काल हिंसाचार प्रकरणी दाखल असलेल्या माजी नगरसेवक रहेमान शहा तसेच आवामी पार्टीचे अध्यक्ष मोहंमद रिजवान उर्फ रिजवान बॅटरीवाला काँग्रेस प्रवक्ते (Congress spokesperson) साबीर गौहर यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कारवाईमुळे याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या 33 वर पोहचली होती.

काल रात्री पुन्हा पोलिसांतर्फे अटकसत्र राबविण्यात येवून शहर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात सात जणांना तर आयेशानगर व किल्ला पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 अशा 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेची संख्या 42 वर पोहचली आहे. दंगलप्रकरणी पोलिसांनी कठोर पवित्रा घेत राजकीय नेत्यांची धरपकड सुरू केल्याने अनेक जण भुमीगत झाले असल्याने त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

शहर व आयेशानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये जनता दल नगरसेवक मुस्तकीम डिग्नेटी, सुन्नी जमेतुल उलमाचे (Sunni Jameetul Ulama) कारी हारूण अन्सारी, रजा अ‍ॅकेडमीचे (raza academy) शहराध्यक्ष डॉ. रईस रिजवी, कुल जमात सुन्नी तंजीमचे युसूफ इलियास, काँग्रेस प्रवक्ते साबीर गौहर, अज्जू लसनवाला आदींचा समावेश असल्याने अटकसत्र टळावे यासाठी राजकीय दबावाचा वापर पोलीस यंत्रणेवर केला जात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

हिंसाचारात 11 लाखांचे नुकसान

शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत नवीन बसस्थानकासह परिसरातील दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात येवून नासधूस केली गेली. अनेक दुकानातील साहित्य तसेच सीसीटीव्ही कॅमेरे (cctv camera) दंगलखोरांनी लंपास केले. तर एक दाताच्या दवाखान्यास आग लावून दिली होती. महसुल विभागातर्फे (Department of Revenue) या सर्व नुकसानींचे पंचनामे पुर्ण करण्यात येवून जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांना अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत (Tehsildar Chandrajit Rajput) यांनी दिली.

हिंसाचारातील दोषींवर कारवाई अटळ

मालेगाव बंद दरम्यान झालेल्या दंगलप्रकरणी दगडफेक, तोडफोड, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा आणणे व धार्मिक तेढ निर्माण करणे आदी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारातील दोषींवर पुरावे व सहभाग तपासून कारवाई केली जात आहे. कुणावरही आकस ठेवून कारवाई केली जाणार नाही. हिंसाचारातील दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

Related Stories

No stories found.