डीपीडीसीचा 414 कोटींचा आराखडा
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

डीपीडीसीचा 414 कोटींचा आराखडा

नाशिक |प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या (Corona) संकटात विकासकामांसाठी निधीवर (Fund) आलेली मर्यादा, टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्राप्त झालेला निधी, ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कामे अशा घटनाक्रमात आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना जिल्हा नियोजन समितीचा 2022-2023 चा आराखडा बनवण्याचे काम नियोजन विभागाने सुरू केले आहे. पुढील वर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 414 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे...

जिल्हा नियोजन समितीने (DPDC) पुढील 2021-22 आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, अनु.जाती उपयोेजनांसाठी 732 कोटींचा आराखडा तयार केला होता. करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (Corona Second Wave) उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील 30 टक्के रक्कम आरोग्य क्षेत्रासाठी खर्च करण्याचे निर्बंध घालण्यात आले.

करोनामुळे विकासकामे (Development work) रखडली त्यामुळे निधीही खर्च होऊ शकला नाही. निर्बंध शिथिल झाल्यानंतर हळूहळू निधी मिळण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये निधी प्राप्त होण्याचा मार्ग अधिक होऊन नियोजित आराखड्यानुसार शासनाने प्रत्येक जिल्ह्यास निधीचे वितरण सुरू केले.

त्याअनुषंगाने जिल्ह्याला निधी प्राप्त झाला. 2022-2023 साठी सर्वसाधारण योजनेसाठी 414 कोटी 73 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 जानेवारी रोजी होणार्‍या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

18 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होणार्‍या जिल्हा नियोजनाच्या विभागीय बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या आराखड्यात 560 कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com