41 हजार नावे वगळली; मतदार यादीकडे नजरा

41 हजार नावे वगळली; मतदार यादीकडे नजरा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात विशेष मतदारयादी (Special voter list) पुनरीक्षण मोहिमेंतर्गत हजार 704 88 नवमतदारांची नोंदणी (Registration of new voters) करण्यात आली असून, 40,885 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. बुधवारी (दि. 5) अंतिम मतदार यादी (voter list) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ही मतदार यादी जाहिर करण्यापुर्वी जिल्ह्यातील मतदार नोंदणीत (Voter registration) मोठा सावळागोंधळ असल्याचे पुढे आले. शिवसेनेने (shiv sena) दुबार मतदारांची यादी जाहीर करीत मतदार यादीतील उणिवा चव्हाट्यावर आणल्या.मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसील कार्यालयात (tehsil office) कार्यवाही सुरू केली आहे.

या अंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 2 हजार 745 मतदारांचे फोटो जुळविण्यात आले. त्यापैकी 54 हजार 955 मतदारांचे फोटो आतापर्यंत जुळल्याने या सर्वांना नोटिसा देत फेर तपासणीचे काम बीएलओ यांनी केले. त्याच सोबत दोन पैकी कुठले एक नाव कायम ठेवायचे, याबाबत विचारत तेच नाव यादीत ठेवण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्रीय आयोगाच्या जिल्ह्यात निवडणूक मार्गदर्शनानुसार 5 नोव्हेंबरपासून विशेष मतदारयादी पुनरीक्षण मोहीम घेण्यात आली.

या अंतर्गत निवडणूक शाखेने 15 ही विधानसभा मतदारसंघांत नवमतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यासोबतच मतदारयादीतील दुबार व मृत नावे वगळणे, मतदारांच्या नाव पत्त्यात दुरुस्ती तसेच एका ठिकाणाहून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविले होते. जिल्ह्यातील मतदारांनी विशेष मतदार मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निवडणूक शाखेला तब्बल 1 लाख 42 हजार 658 अर्ज आले. त्यामध्ये 88 हजार 704 नवमतदारांनी ोंदणी केली, तर 40 हजार 885 मतदारांची नावेही यादीतून वगळण्यात आली. या नावांमध्ये दुबार व मृत मतदारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 6,433 मतदारांनी नाव आणि पत्त्यात दुरुस्तीसाठी अर्ज केले. तसेच एका ठिकाणाहून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या 6,636 व्यक्तींनी स्थलांतरणासाठी अर्ज केले. सर्व पंधराही विधानसभा मतदारसंघांतील अंतिम मतदारयादी बुधवारी (दि. 5) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी निवडणुका या अंतिम यादीनुसार होणार असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या नजरा यादी प्रसिद्धीकडे लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com