ऑक्सिजन अभावी नाशिकमधील ३० टक्के उद्योग बंद

ऑक्सिजन अभावी नाशिकमधील ३० टक्के उद्योग बंद

सातपूर | Satpur

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उद्योगक्षेत्र वेगाने पूर्वस्थितीकडे वळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ऑक्सिजन अभावी उद्योगक्षेत्रातील 30 टक्के कारखाने बंद आहेत. तर उर्वरित कारखान्यांमध्ये मनुष्यबळाच्या पूर्ततेअभावी 40 ते 50 टक्के कामगारांच्या उपस्थितीत उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

राज्य शासनाचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यात कडक लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊन उद्योगक्षेत्राला कठोर निर्बंध लावले होते. त्यामुळे जवळपास 90 टक्के उद्योग क्षेत्र बंद होतं.

तत्पूर्वी शहरात आजाराचे प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. उद्योग पेक्षा जीवन महत्त्वाचे या संकल्पनेवर उद्योगक्षेत्रातील ऑक्सिजन रुग्णालयांसाठी वळविण्यात आले होते. त्यामुळे ऑक्सिजन वर आधारित उद्योग अगोदरच बंद झाले होते.

लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक कामगारांनी आपल्या गावाकडे स्थलांतर केले परिणामी काल सुरू झालेल्या उद्योगक्षेत्रात गावाकडून येणाऱ्या कामगारांच्या तुटवड्यामुळे कारखान्यांमध्ये 40 टक्के कामगारांची उपस्थिती दिसून आली

ऑक्सिजन पुरवठा सुरू करा आयमाची मागणी

उद्योगक्षेत्रातील लहान-मोठे उद्योग हे परस्पराशी संलग्न आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सीजन सिलेंडर ची गरज असलेल्या उद्योगांवर इतर उद्योग अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे उद्योगांवरही त्याचा दुष्परिणाम होत असल्याने व शहरातील रुग्णसंख्या भेटल्यानंतर ऑक्सिजनची गरज पूर्वीची राहिलेली नसल्यामुळे प्रशासनाने उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आयमाच्या वतीने उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उद्योजकांची मागणी रास्त असल्याचे सांगून शहरातील ऑक्सिजनची मागणी व पुरवठा याचा आढावा घेऊन येत्या एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. अतिरिक्त गॅस उपलब्ध असल्यास उद्योगांना पुरवठा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान औद्योगिक क्षेत्रात महिंद्र उद्योगासह निवडक उद्योगांनी कामगारांचे निवासाची व्यवस्था करून उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली होती, मात्र सोमवार पासून लोक डाऊन शिथिल होत असल्याने शनिवारपासूनच कामगारांना घरी पाठवून दिले होते. आज पहिल्या शिफ्ट पासून कामगार घरूनच कामावर आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com