
सातपूर | प्रतिनिधी
कोविंड प्रादुर्भावामुळे नागरिकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने भविष्य निर्वाह निधी विभागाने 20 हजार सभासदांना 46 कोटी रुपये त्याच्या खात्यात वाटप केले आहे.
तसेच मालक व कामगार यांच्या निधी पोटी शासनाने 27 कोटी 95 लाख रुपये राधा करून मदतीचा हात पुढे केला आहे.
केन्द्रीय कामगार मंत्रालय, भारत सरकार यांनी करोनावर मात करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरु केली असून त्या अंतर्गत नाशिक परीक्षेत्रात येणाऱ्या नाशिक, जळगाव , धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर परिसरातील कामगार व मालक वर्गानी आर्थिक सवलतींचा लाभ घेतला आहे.
त्यात नॉन रिफंडेबल उचलपोटी नाशिक परिक्षेत्रात येणाऱ्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यातील आज पर्यंत २० हजार ८७२ भविष्य निर्वाह निधी सभासदांनी या योजेनेचा लाभ घेतला असून, त्यापोटी एकूण ४६ कोटी ९ लाख ९३ हजार ३११ रुपये त्या सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
तसेच कंपन्यां, आस्थापना ज्यांच्या स्वत:च्या ट्रस्ट (Trust) त्यांच्या एकूण 1427 सभासदांना 20 कोटी 38 लाख 62 हजार 997 एवढी रक्कम ना परतफेड उचल दिली आहेत.
नाशिक विभागात येणाऱ्या एकूण 5 हजार 265 कंपन्यांना सुरुवातीस मार्च, एप्रिल, व मे, साठी हि सवलत जाहीर केली होती.
परंतु ही सवलत जून, जुलै व ऑगस्ट,२०२० या महिन्यासाठीदेखील वाढवण्यात आली. त्यापोटी २७ कोटी ९५ लाख २९ हजार ३९४ एवढ्या रक्कमेचा लाभ कंपनी मालक व सभासदांनी घेतला आहे.
त्यामध्ये एकूण ३८ हजार ९९० भविष्य निधी सभासद आहे.या व्यतिरिक्त भविष्य निधी क्षेत्रीय कार्यालय नाशिकने या कोविड १९ महामारीच्या लॉक डाऊन काळात पेन्शन धारकांना तत्पर मदतीचा हात दिला आहे.
अश्या या अडचणीच्या काळात वयोवृद निवृत्ती वेतन धारक (पेन्शनर) लोकांची आर्थिक अडचण होऊ नये म्हणून भविष्य निधी कार्यालयाने नाशिक, जळगाव, धुळे , नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यातील एकूण 1 लाख 30 हजार 149 एकुणपन्नास पेन्शनं धारकांना त्यांची पेन्शन दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याच्या बँक खात्यात जमा करत आहे.
नाशिक कार्यालय हे देशातील सर्वात जास्त पेन्शनर खाते असलेले देशातील दोन नंबरचे कार्यालय असून वयोवृद पेन्शन धारकांना तत्पर पेन्शन देण्यात कायम काले जाते.
सरकारच्या आदेशानुसार हे सर्व काम विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या १५ टक्के कर्मचारी आळीपाळीने कामावर हजर राहून पार पाडत आहे. या अडचणीच्या काळात देशातील कामगारांना सेवा देत आहे. या योजनेचा लाभ सर्वं भविष्य निधी सभासदांनी व निवृत्ती वेतनधारकांनी घ्यावा व या आलेल्या कोरोना महामारीससमर्थपणे तोंड द्यावे.
एम. एम. अशरफ .क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त