‘ऑनलाइन’ला ४० टक्के क्रेडिट; विद्यापीठ अनुदान आयाेगाचा निर्णय

Online exam
Online exam

नाशिक |Nashik (प्रतिनिधी)

उच्च शिक्षणात आतापर्यंत वीस टक्के क्रेडिट हे ऑनलाइन शिक्षणाला देण्यात येत होते. मात्र, आता ते ४० टक्के इतके करण्यात येणार आहे.

करोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने आता ४० टक्के क्रेडिट हे ऑनलाइन शिक्षणाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबबातचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना 'स्वयम' या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासाठी 'तरुणांसाठी सक्रिय वेबआधारित ऑनलाइन अभ्यासक्रम श्रेयांक मार्गदर्शक अधिनियम २०२१' प्रसिद्ध केला आहे.

या ऑनलाइन क्रेडिटचे अभ्यासक्रमही नियमित शैक्षणिक वर्षातील सत्र समाप्तीच्या जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यातच समाप्त होणार आहेत. 'स्वयम' पोर्टलवर अभ्यासक्रम उपलब्ध करणाऱ्या संस्थांकडून या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही केले जाणार असून त्यांना श्रेणी देण्यात येणार आहेत.

विद्यापीठांना एका विद्यार्थ्याला एका सत्राला ४० टक्के क्रेडिट घेण्याचीच परवानगी देता येणार असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या श्रेयांकाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रिया विद्यापीठांच्या विद्वत परिषदांनी निश्चित कराव्यात, अशी सूचना केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com