निमाच्या विश्वस्त समितीच्या निवडीसाठी ४० अर्ज दाखल

निमाच्या विश्वस्त समितीच्या निवडीसाठी ४० अर्ज दाखल
निमा हाऊस

सातपूर | Satpur

निमाच्या (NIMA) विश्वस्त समितीच्या निवडीसाठी मागवण्यात आलेल्या अर्जांची आवक जावक नोंदणी प्रक्रिया (Registration Process) सूरूच असून कालपर्यंत 40 अर्ज दाखल झाल्याची नोंद आहे. अजूनही अर्ज प्रलंबीत असल्याने किती अर्ज दाखल होतात याकडे उद्योजकांचे लक्ष लागलेले आहे.

निमाच्या निवडणूकीपासूनच वादाचा भोवरा घोंगावत आहे. दोन गटाच्या विवादामुळे निमाला ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग आला होता. त्यातून दोनही गटाला बाजूला ठेवत धर्मदाय सहआयुक्तांनी तिन जणांचे प्रशासकिय मंडळ नेमले होते. मागिल वर्षभरापासून येथे प्रशासक मंडळाद्वारे कार्यभार केला जात आहे.

या ठिकाणी नव्या पदाधिकार्‍याचे विश्वस्थ मंडळ नेमण्याचा धर्मदाय सहआयुक्तांचा निर्णय असून, त्यासाठी त्यांनी जाहीरात प्रसिध्द करुन निमा सभासद उद्योजकांकडून अर्ज मागविले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत काल पर्यंत ४० अर्ज आवक जावक प्रणालीत नोंदणी झालेले आहेत. अजूनही आवक जावक नोंदणी सूरूच असल्याने किती जणांनी व कोणी कोणी अर्ज दाखल केलेले आहेत याबद्दल उद्योजकांमध्ये कमालीची उत्सूकता दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com