निफाड | Niphad

शिवडी येथील सचिन ज्ञानेश्वर भवर यांची कन्या राई सचिन भवर (वय 4 वर्षे) हीने चक्क पायी चालत महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर आपल्या पालकांसोबत सर केले.

जिद्द अन् चिकाटीच्या जोराने राईने हे कळसूबाई शिखर पार केले. सचिन भवर यांना लहानपणापासून भटकंतीची आवड असल्याने अनेकदा ते गड किल्ले यांना भेटी देतात. याच आधारे येणारी पिढी देखील मोठ्या प्रमाणात आपली भारतीय संस्कृतीच जतन व्हावे, यासाठी आपल्या मुलांना आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असते.

जेणेकरुन त्यांनाही गड, किल्ले, शिखर यांची माहिती होऊन या जुन्या रुढी परंपरा समजाव्यात. भवर यांना भटकंतीची आवड असल्याने ते आपली मुलगी राई (वय वर्षे 4) हिला घेऊन कळसूबाई शिखर सर करण्यासाठी निघाले.

न थांबता सलग तीन तासांत त्यांनी कळसूबाई शिखर पार केले. त्यांचे समवेत त्यांची मुलगी राई हिनेही वडिलांबरोबर पायी चालत कळसूबाई शिखर पार केले. तिच्या या परिश्रमाबद्दल तिचे कौतुक होत आहे.