करोना
करोना
नाशिक

जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ७४४ करोना रुग्णांना डिस्चार्ज

२ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ हजार ९६६ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९७, चांदवड ०७, सिन्नर ५९, दिंडोरी ५९, निफाड १०३, देवळा ११, नांदगांव ५०, येवला ३६, त्र्यंबकेश्वर ०९, सुरगाणा ०१, पेठ ०८, कळवण ०१, बागलाण १२, इगतपुरी ४७, मालेगांव ग्रामीण २१ असे एकूण ५२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४५९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३२ तर जिल्ह्याबाहेरील १७ असे एकूण २ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७ हजार ४४४ रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ७५ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १८१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७९ व जिल्हा बाहेरील १४ अशा एकूण ३४९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️७ हजार ४४४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ हजार ९६६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार १२९ पॉझिटिव्ह रुग्ण.

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Deshdoot
www.deshdoot.com