दिलासा : दिवसभरात ४ हजार ३८२ रुग्ण करोनामुक्त

३४ रुग्ण दगावले; ३ हजार ६८३ रुग्णांची दिवसभरात वाढ
दिलासा : दिवसभरात ४ हजार ३८२ रुग्ण करोनामुक्त
करोनामुक्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज दिलासादायक बाब घडली आहे. आज तब्बल ४ हजार ३८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर रुग्णसंख्यादेखील काहीसी कमी झाली असून संपूर्ण जिल्ह्यात आज ३ हजार ६८३ रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ३४ रुग्णांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत.

आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्ण संख्येत नाशिक मनपामध्ये 2 हजार 14, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 540, मालेगाव मनपा क्षेत्रात 50 आणि जिल्हा बाह्य 79 रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण ३ हजार ३४५ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. यामध्ये आज मृत्यू झालेल्या ३४ रुग्णांचादेखील समावेश आहे.

आज नाशिक जिल्ह्यात झालेल्या मृतांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात 9, मालेगाव मनपामध्ये 01, नाशिक ग्रामीणमध्ये 24 रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com