त्र्यंबकेश्वर पालखी सोहळा
त्र्यंबकेश्वर पालखी सोहळा
नाशिक

त्र्यंबकेश्वरी तिसरा श्रावण पालखी सोहळा उत्साहात

त्र्यंबक सुनेसुने

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर नगरीत तिसऱ्या श्रावण सोमवारचा पालखी सोहळा साधेपणाने पार पडला.

श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने दुपारी त्र्यंबकेश्वर मंदिरातून निघालेली पालखी सवाद्य कुशावर्तवर आली. येथे त्र्यंबकेश्वराच्या सोन्याच्या मूर्तीला पवित्र गोदावरीत अभिषेका करण्यात आला. त्यानंतर सर्वाना दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली. अशा प्रकारे पालखी सोहळा झाला.

त्र्यंबक शहरासह प्रदक्षिणा मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर कडून ऑनलाईन दर्शन सुविधा आजपासून सुरू करण्यात आली. ऑन लाइन सुविधा सुरू झाल्याने यात्रेकरूवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.

देवस्थानचे चेअरमन न्यायाधीश एम एस बोधनकर यांचे मार्गदर्शनाखाली ट्रस्ट मंडळ कार्यरत आहे. यावेळी देवस्थानचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल व अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com