जिल्ह्यात ३९६ नव्या करोनाबाधितांची भर; ५८ रुग्ण दगावले

जिल्ह्यात ३९६ नव्या करोनाबाधितांची भर; ५८ रुग्ण दगावले

नाशिक | प्रतिनिधी

कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीनंतर नाशिक जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट बघायला मिळते आहे. मात्र, मृतांचा आकडा आटोक्यात येत नसल्यामुळे काहीची चिंता अजूनही व्यक्त केली जाते आहे...

उद्यापासून (दि ०१) नाशिकमधील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. याबाबतची बैठक आज पार पडल्यानंतर प्रशासनाकडून पुढील १५ दिवसांची नियमावली धाडण्यात आली आहे.

एकीकडे रुग्णसंख्या घटत असल्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालेला असतानाच दुसरीकडे मृतांची संख्या मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात ५८ रुग्णांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत. यात ग्रामीणमधील ३६, नाशिक शहरातील २० तर मालेगाव मनपा क्षेत्रातील २ रुग्णांचा समावेश आहे.

आज नाशिक शहरात एकूण ३९६ नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर ८९० रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

आज बाधित रुग्णांची जी वाढ झाली आहे त्यात नाशिक मनपा क्षेत्रात १६८, नाशिक ग्रामीणमध्ये २१६, मालेगाव मनपा क्षेत्रात ०७ तर जिल्हाबाह्य ०५ रुग्णांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यात ५८ रुग्ण दगावले असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील मृतांची संख्या वाढून ४ हजार ७२४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, निर्बंध उठवण्यात आले असले तरीही नाशिककरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, नियमित मास्क वापरावे तसेच सामाजिक अंतराचे भानपाळावे, वेळोवेळी हात स्वच्छ करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com