बाबो! इगतपुरीत संततधार पावसात एका गाण्यासाठी तब्बल 36 तास शुटींग

बाबो! इगतपुरीत संततधार पावसात एका गाण्यासाठी तब्बल 36 तास शुटींग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशकात आता चित्रीकरण (Shooting Started in Nashik) सुसाट सुरु झाल्या आहेत. अनेक मराठी मालिकांची आजही नाशिकच्या परिसरात शुटींग सुरु आहेत. अशातच पावसाळ्यातील इगतपुरीचा (Igatpuri) परिसर म्हणजे साक्षात काश्मीरच...यामुळे या परिसरासह त्र्यंबक (Trimbak), पेठ (Peth) आणि सुरगाण्याच्या निसर्गरम्य परिसरात (Surgana Nature) सध्या निर्मात्यांची पावले वळू लागली आहेत...

नाशिकच्या नाद खुळा म्युझिकने (Naad Khula Music) संजू राठोड (Sanju Rathod) आणि सोनाली सोनवणे (Sonali Sonawane) स्वरबद्ध केलेलं हे गीत निल चव्हाण (Neel Chavan) व श्रद्धा पवार (shradha pawar) या नवोदित कलाकारांना घेऊन दिग्दर्शक अभिजित दाणी (Abhijeet Dani) यांनी येड्यावानी करतय हे गीत प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडत आहे.

कोरेगाव कोथळा (Korgaon Kothala) या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील गावात गाण्याचे चित्रीकरण करण्याचे ठरवले. चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि दुपारनंतर जोराचा पाऊस सुरुवात झाला. दोन दिवस मागे न हटता चित्रीकरण सतत 36 तास काम करून पूर्ण केले.

गीताचा दिग्दर्शक अभिजीत दाणी सांगतो की, सर्वांकडून काम करून घेणं सोपं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे काम करून खूप मुश्कील झालं होतं मेकअप करणं पुन्हा पावसातील उभा राहणार आणि थोडा पाऊस आला की पुन्हा जाऊन बसणा-या खूप गोष्टी अवघड होता.

त्यात कॅमेरा बाकीच्या गोष्टी लाईट काही गोष्टी खूप त्रासदायक होता तरी सर्व मॅनेज करून टीमने पूर्ण सहकार्य केलं. भर पावसात आणि उपाशी राहून सर्व कर्मचाऱ्यांनी टीमच्या सर्व मेंबरने या ठिकाणी आपले योगदान दिलं आणि हे अविस्मरणीय गीत पूर्ण होण्यासाठी सहकार्य केलं.

ग्रामीण भागातील नयनरम्य दृश्य असलेले ठिकाण अशोका धबधबा (Water Fall) पासून जवळच असलेलं कोरेगाव कोथळा हे गाव नयनरम्य दृश्य साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण या गीतासाठी साजेसं होतं म्हणून हे गाव निवडण्यात आलं.

पावसाचा कुठलाही अंदाज नव्हता पाऊस आला तर निघून जातो असे इथले गावातले लोक बोलायचे आणि नंतर ज्या दिवशी पाऊस सुरु झाला तो खूप भयानक होता रात्री झोपण्याची सोय नव्हती गाडीत झोपावं लागलं आणि पहाटे पाच वाजता जेवण करणं हे खूप मुश्कील काम होतं आणि पुन्हा लगेच नऊ वाजता सेटवर येणार हे खूप अवघड झाले होते अशा प्रतिक्रिया गाण्याचा भाग असलेल्या व्यक्तींनी शेअर केल्या.

Related Stories

No stories found.