शहरात ३५ तर ग्रामीण भागात ४२ करोनाबाधित

शहरात ३५ तर ग्रामीण भागात ४२ करोनाबाधित
करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या २४ तासात जिल्ह्यात (Nashik District) ८१ रुग्ण करोनाबाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. शहरात (Nashik City) करोनाबाधितांची संख्या ३५ आहे तर ग्रामीण भागात (Nashik Rural) ४२ नागरिक बाधित झाले आहेत...

गेल्या २४ तासात एकूण ८१ रुग्ण बाधित झाले तर ७० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. शहरात ३५, ग्रामीण भागात ४२, तर मालेगाव (Malegoan) १ तर जिल्हा बाह्य ३ रुग्णांची नोंद झाली आहे.

आज जिल्ह्यात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. हे तीनही रुग्ण ग्रामीण कार्यक्षेत्रातील आहेत. शहर आणि मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण दगावला नसून एकूण बळींची संख्या ८ हजार ५८० इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com