करोना
करोना
नाशिक

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७२६९ वर

२४ तासांत ३२२ पॉझिटिव्ह रूग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात 322 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 7 हजार 269 झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून विक्रमी 1028 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील 9 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 270 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात एकुण 388 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील 220 रूग्ण आहेत. यात शहरातील नाशिकरोड, हिरावाडी, पंचवटी, पेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, गौतमनगर, सराफ बाजार, इंदिरानगर येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 4 हजार 263 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 86 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 1 हजार 712 झाला आहे.

यामध्ये सर्वाधिक ओझर, इगतपुरी, लासलगाव, पळसे, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, विल्होळी, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये आज 6 रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 147 वर पोहचला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 137 वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 9 जणांचा मत्यू झाला.

यामध्ये अधिक नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 341 झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 270 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 4 हजार 789 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने तब्बल विक्रमी 1028 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 733 आहेत. जिल्हा रूग्णालय 2, ग्रामिण 232, मालेगाव 12, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 4 व होम कोरोंटाईन 44 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून 28 हजार 528 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 20 हजार 577 निगेटिव्ह आले आहेत. 7 हजार 269 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 69 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : ७२६९

* नाशिक : ४२६३

* मालेगाव : ११६३

* उर्वरित जिल्हा : १७१२

* जिल्हा बाह्य : १३७

* एकूण मृत्यू : ३४१

* करोनामुक्त : ४७८९

Deshdoot
www.deshdoot.com