जिल्ह्याला 32 हजार लसी उपलब्ध

पुन्हा लसीकरण होणार सुरळीत
जिल्ह्याला 32 हजार लसी उपलब्ध

नाशिक । Nashik

नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवडड्याचा सामना केल्यानंतर अखेर आज जिल्ह्याला 32 हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. यातील साडआठ हजार लसी नाशिक महापालिका, अडीच हजार मालेगाव मनपा तर उर्वरीत 21 हजार ग्रामिण भागासाठी वितरीत करण्यात आल्याने पुन्हा सर्व शासकीय केंद्रांवर लसीकरण सुरळीत होणार आहे.

शहर तसेच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात 7 लाख 39 हजार 438 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याने लसीकरण जवळपास बंद होते परंतु दुपारी लस उपलब्ध झाल्याने दिवसभरात दोन्ही मिळून 5 हजार 539 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दोन दिवस लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद होती. आज 32 हजार लसींचा पुरवठा झाल्याने नाशिक महापालिकेच्या 21 तर जिल्हाभरातील 36 केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

दरम्यान आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा 1 लाख 24 हजार 110 जणांना पहिला तर 52 हजार 190 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमपैकी आतापर्यंत 2 लाख 29 हजार 441 जणांना पहिला तर 46 हजार 237 जणांन दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांपुढील 2 लाख 51 हजार 965 जणंना पहिला तर 31 हजार 924 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात 2 हजार 942 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 1 हजार 914, ग्रामिण जिल्ह्यात 890, मालेगाव 138 असे लसीकरण झाले आहे. तर 2 हजार 497 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

18 वर्षावरील सर्व वयोगटांतील नागरीकांचे लसीकरण करण्यात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आज दिवसभरात जिल्ह्यात पिंपळगाव, मोहाडी, इंदिरागांधी, मालेगाव नीमा, नाशिकरोड युपीएसी या पाच केंद्रांवर 1 हजार 269 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत या गटातील 3 हजार 571 जणांना लस देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com