
वणी | प्रतिनिधी | Vani
सप्तशृंगी गडावर (Saptshringi Gadh) मालेगाव (Malegaon) येथील दाभाडी येथून दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप (pickup) उलटून २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत माहिती अशी की, आज मंगळवार (दि.२७) रोजी सकाळच्या,सुमारास दाभाडी (Dabhadi) येथील बंडु गांगुर्डे यांच्या पिकअप क्रमांक एमएच १८ बी.झेड. ८१६७ या क्रमांकाच्या पिकअपमधून सदर भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली.
दरम्यान,यानंतर गडावरील नागरिकांनी आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत काही जखमींना वणी तर काहींना नांदुरी येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.