सातपूरच्या पाच केंद्रांद्वारे ३१ हजार लसीकरण

विभाग निहाय लसीकरणाचे नियोजन करण्याची मागणी
सातपूरच्या पाच केंद्रांद्वारे ३१ हजार लसीकरण

सातपूर | Satpur

केंद्र आणि राज्य सरकारने देशात (दि. १६) जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मंजुरी दिल्यानंतर शहरातील सर्वच भागांमध्ये लसीकरणाला गती देण्यात आली होती मात्र सातपूर विभागाने यात आघाडी घेत पाच लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एक तीस हजाराचा टप्पा गाठलेला आहे.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला फक्त कोरोना 'वॉरिअर्स (फ्रंटलाईन वर्कर्स) आणि ६० वर्षे वयावरील नागरिकांना त्यानंतर ४५ वर्षे वयावरील नागरिकांना देण्यात आली, आणि आता दि. १ मेपासून १८ ते ४४ वय असलेल्या युवकांना सुरू केली होती.

कोरोना संसर्गजन्य रोगाला सुरक्षा कवच म्हणून नाशिक शहरात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सातपूर विभागासाठी पाच केंद्रे असून, या पाच केंद्रांवर आजपर्यंत तब्बल ३१ हजारांच्यावर नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

नाशिक शहरात सुरुवातीला मध्यवर्ती ठिकाणीच लस दिली जात होती. नंतर उपनगरांमध्ये केंद्र सुरू करण्यात आले. सातपूर विभागासाठी सर्वप्रथम मनपाच्या हॉस्पिटल मायको आणि ईएसआय रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एमएचबी कॉलनीतील मनपा रुग्णालय, गंगापूर गावातील मनपा रुग्णालय आणि संजीवनगर येथेही लसीकरण केंद्राची सोय करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी मायको हॉस्पिटल सातपूर व ईएसआय रुग्णालयात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सातपूर वासियोंपेक्षा जास्त नाशिक शहरातून घेण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत त्यामुळे कामगार वर्गांमध्ये ही नाराजीचा सूर उमटत आहे.

नाशिक महानगरपालिका सहा विभागात विभागण्यात आली असून विभागनिहाय नागरिकांना लसीकरणाची सोय करून द्यावी अशी मागणी कामगार संघटनांकडून मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com