जिल्ह्यातील धरणांत ३१ टक्के जलसाठा

गतवर्षी हे प्रमाण ३७ टक्के : गंगापूर धरणांत ४९ टक्के साठा
जिल्ह्यातील धरणांत ३१ टक्के जलसाठा

नाशिक । Nashik

एकीकडे जिल्ह्यात उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून अशातच धरणातील जलसाठयात घट होत आहे. सद्यस्थितित जिल्ह्यातील २४ धरणांत ३१ टक्के जलसाठा आहे. तर हेच प्रमाण गतवर्षी ३७ टक्के इतके होते.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाउस झाला आहे. गतवर्षी गंगापूर, दारणा या मध्यम क्षमतेच्या धरणासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण अशी अोळख असलेले गिरणा धरण सलग दुसर्‍या वर्षी शंभर टक्के भरले होते.

इतर छोटी मोठी धरणे देखील पाण्याने लबालब भरली होती. मोठया धरणातून विसर्ग सुरु होता. परंतु आता उन्हाची दाहकता वाढत असून अनेक तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

तर अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अनेक भागांत नदी, नाले व ओढे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पुढिल काळात पाण्याची मागणी वाढते आहे.

मध्यंतरी अनेक धरणांतून आवर्तन सोडण्यात आले. आता पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक रोटेशननूसार पाणी सोडले जात आहे. धरणात जलसाठा कमी असल्याने पाणी टँकर वाढवावे लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com