वावी l Vavi (वार्ताहर संतोष भोपी)

सिन्नर तालुक्यात नुकतीच निवडणूक प्रक्रियेला सुरवात करण्यात आली असून वावी ग्रामपंचायतसाठी ४ प्रभागातून जवळपास ३१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर छाणनीत झालेल्या प्रक्रियेत ३ अर्ज बाद करण्यात आलेले आहेत.

दि. ३० बुधवार रोजी अंतिम मुदत असल्याने अंतिम मुदती पर्यंत वावी गावातून प्रभाग क्रमांक १ मधून ३ जागेसाठी जवळपास ८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात शितल किशोर आनप, अरुण कोंडाजी भरीतकर, कांताबाई रघुनाथ मोरे, सारिका विश्वनाथ लांडगे, प्रशांत रामनाथ कर्पे, प्रेमलता कैलास जाजू, मिना प्रदीप मंडलिक, नंदलाल लालचंद मालपाणी आदींनी अर्ज केले आहे.

तर प्रभाग क्र. २ मध्ये ३ जागेसाठी ९ उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यात इलाही नबाब शेख, गणेश चंद्रकांत वेलजाळी, नंदा रमेश गावडे, वैशाली जालिंदर वाल्हेकर, दिपाली ज्ञानेश्वर खाटेकर, सोमनाथ रखमा संधान, कमल दिलीप खाटेकर, विजय भीमराव काटे, कैन्हयालाल लक्ष्मीनारायण भुतडा आदींचा समावेश आहे.

तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ जागेंसाठी ९ अर्ज आले आहेत. त्यात गणेश नामदेव वेलजाळी, अरुण कोंडाजी भरीतकर, सुशीला अरुण भरीतकर, गणेश चंद्रकांत वेलजाळी, रामराव नामदेव ताजणे, मीना रामनाथ काटे, संगीता विजय काटे, सुनिता सोमनाथ संधान, जितेंद्र राजेंद्र नवले, आदीचा समावेश आहे.

तर प्रभाग क्रमांक ४ साठी ६ उमेदवारांचे अर्ज आले आहे. त्यात शंकर नानाजी राजेभोसले, नीता भागवत पठाडे, साधना विनायक घेगडमल, सविता किरण घेगडमल, अश्विनी सचिन वेलजाळी, संदीप बबन राजेभोसले, आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुशीला भरीतकर यांनी जनरल जागेसाठी व ओबीसी महिलासाठी अर्ज दाखल केले आहेत व संगीता विजय काटे यांनी जनरल जागेसाठी व ओबीसी महिला साठी आमने सामने दोन जागेसाठी अर्ज दाखल केले आहे.

या दरम्यान दि.३१ रोजी झालेल्या छानणी प्रक्रियेत ३ अर्ज बाद झाले आहेत त्यात नंदलाल लालचंद मालपाणी व सोमनाथ रखमा संधान, सुनिता सोमनाथ संधान आदींचे अर्ज बाद झाले आहेत. तर छानणी झाल्यानंतर राहिलेल्या उमेदवारांमध्ये रंगतदार लढाई होण्याचे चिन्ह दिसत आहेत तर आता माघार घेणार कोण या कडे ग्रामस्थाचे लक्ष वेधेले आहेत.