एकतीस विकास संस्थानी जिल्हा बँकेचे कर्ज फेडले

एकतीस विकास संस्थानी जिल्हा बँकेचे कर्ज फेडले

निफाड । प्रतिनिधी Nashik

तालुक्यातील शेतकर्‍यांना शेती पिकांसाठी कर्जपुरवठा करणार्‍या 140 विकास सोसायट्यांपैकी ( Development Institutions ) जवळपास 31 सहकारी संस्थांनी जिल्हा बँकेच्या ( District Bank ) कर्जाची 100 टक्के कर्जफेड केल्याने अशा सहकारी संस्थांच्या सचिवांचा सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निफाड तालुक्यात सहकारी संस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे विणले आहे. कृषीप्रधान समजल्या जाणार्‍या या तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात विकास सोसायट्यांकडून कर्ज उचलतो. यावर्षी करोना प्रादूर्भावामुळे शेतकरी अडचणीत असतांनाही तालुक्यातील 31 विकास संस्थांनी जिल्हा बँकेच्या कर्जाची 100 टक्के कर्जफेड केली आहे.

या कर्जफेड करणार्‍या संस्थांमध्ये प्रामुख्याने खालील गावांचा समावेश असून यात दावचवाडी, देवपूर, पिंपळगाव बसवंत, कुरुडगाव, रसलपूर, काथरगाव, सुंदरपुर, शिवरे, सावरगाव, नांदूरखुर्द, पिंपळगाव नजीक, कोटमगाव, लासलगाव, देवगाव, वाकद, वाहेगाव, ब्राह्मणवाडे, अंतरवेली, गोरठाण, शिंपी टाकळी, चाटोरी, शिंगवे, तळवाडे, चापडगाव, सायखेडा, तारुखेडले, तामसवाडी, लालपाडी, भुसे, रेडगाव या गावच्या सोसायट्यांनी 100 टक्के कर्जफेड केली असून त्यासाठी वरील संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सचिव व सेवकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

तालुक्यात ज्या सोसायट्यांनी जिल्हा बँक कर्जाची 100 टक्के परतफेड केली त्या सर्व सोसायटी सचिवांचा निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com