नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात 30 हजार पक्ष्यांची नोंद

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात 30 हजार पक्ष्यांची नोंद

निफाड । प्रतिनिधी Niphad

नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) पक्षी अभयारण्यात (Bird sanctuaries) या हंगामातील करण्यात आलेल्या चौथ्या मासिक पक्षी प्रगणनेत 30 हजार 513 पक्ष्यांची नोंद (Record of birds) करण्यात आली आहे. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात (winter season) दर महिन्याला वनविभाग (Forest Department), पक्षीमित्र (Pakshimitra), स्वयंसेवक, स्थानिक गाईड यांच्या मदतीने पक्षी प्रगणना करण्यात येते. साहजिकच या हंगामातील चौथी पक्षी प्रगणना सोमवारी (दि.3) सोशल डिस्टन्स (Social distance) पाळून करण्यात आली.

या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगाव थडी, मध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा एकूण सात ठिकाणी करण्यात आली. यासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पक्षी निरीक्षणात विविध पाणपक्षी व झाडांवरील, गवताळ भागातील पक्षी असे 28728 पाणपक्षी व 1785 झाडांवरील, गवताळ भागातील असे एकूण 30,513 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रगणनेत विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांची नोंद झाली असून यात फ्लेमिंगो (Flamingo), ऑस्पप्रे (Osprey), कॉमन क्रेन (Common crane), नॉर्यन, शॉयलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन, व्हिजन, गडवाल, रुडी शेलडक, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, ब्ल्यू थ्रोड, ब्ल्यू चिक बी ईटर, गोल्डन फ्लावर याबरोबरच स्थानिक स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा,

गुलाबी मैना, कापसी घार, ब्राह्मणी बदक, नकटा, छोटा अर्ली, स्पॉट बील डक, स्पुनबिल, रिव्हीर टर्न, प्रेन्टिकॉल, कमळपक्षी, शेकाट्या, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले आहेत. थंडीच्या आगमनाबरोबरच अधिक स्थलांतरीत पक्ष्यांचे (Migratory birds) आगमन झाले असल्याने पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे. अभयारण्यातील पक्षी गणना (Bird count) सहाय्यक वनसंरक्षक विक्रम अहिरे (Assistant Forest Ranger Vikram Ahire), वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर (Forest Range Officer Shekhar Deokar) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या पक्षी प्रगणनेत वनपाल प्रितीश सरोदे, वनरक्षक संदीप काळे,

आशा वानखेडे, अधिसंख्य वनमजूर ज्ञानेश्वर फापाळे, पक्षीमित्र आनंद बोरा, डॉ.उत्तम डेर्ले, राहुल वडघुले, संदीप गुरमे, डॉ.फुलकर, श्रीमती तुरी मर्चक, अभयारण्यातील गाईड रोशन पोटे, अमोल दराडे, शंकर लोखंडे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, ओंकार चव्हाण, अमोल डोंगरे, गंगाधर आघाव, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजू गायकवाड, विकास गारे, अजय पावडे आदी सहभागीझाले होते.

प्रगणनेतील पक्षी संख्या

  • कॉमन क्रेन : 760

  • स्पूल बिल : 176

  • उघड्या चोचीचा करकोचा : 27

  • गुलाबी मैना : 1200

  • रंगीत करकोचा : 132

  • इरेशियन व्हिजन : 24

  • गढवाल : 2305

  • फ्लेमिंगो : 2

  • जांभळी पानकोंबडी : 309

पाणकणीसमुळे भक्ष्य शोधणे अवघड सध्या नांदूरमध्यमेश्वर जलाशयात पाणवेलींसह पाणकणीस मोठ्या प्रमाणात पसरले असल्याने पक्ष्यांना भक्ष्य शोधण्यास अडचणी येत आहेत. साहजिकच अन्नाच्या शोधार्थ पक्षी स्थलांतरीत होत आहेत. मागील वर्षी वनविभागाने पाणकणीस व पाणवेली काढण्याची मोहीम राबवली होती. त्यामुळे पक्ष्यांना पाणथळ व दलदलीच्या जागेवर भक्ष्य शोधणे सोपे जात होते. मात्र आता वाढत्या पाणवेलींमुळे पक्ष्यांची उपासमार होत असल्याने ते अन्यत्र स्थलांतरीत होत आहेत. पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता यावा यासाठी धरणाच्या पाण्यावरील व परिसरातील पाणवेली काढणे गरजेचे आहे.

गणपत हाडपे, मांजरगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com