जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले तीनशे अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन
USER

जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले तीनशे अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून जिल्हाप्रशासनाची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसचे २५९ रुग्ण उपचार घेत असून या रुग्णांसाठी जिल्ह्यास शनिवारी (दि.२२) ३०० अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.

पोस्ट कोव्हिड रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा गंभीर आजार बळावत आहे. मागील पाच दिवसांपुर्वी रुग्णांचा आकडा १५० वरुन आता २५९ इतका झाला आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रणासाठी जिल्ह्यात आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजनही सुरु झाले आहे. त्यासाठी आता स्वतंत्र तीन अधिकाऱ्यांचीही विविध स्तरावर नियुक्ती करत जबाबादारी सोपविण्यात आली आहे.

नाशिक शहरामध्ये महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर इंजेक्शन पुरवठा नियंत्रित आणि समन्यायी पध्दतीने वाटपाचे काम सोपविले आहे. तर ग्रामीण भागात जिल्हा शल्य चिकित्सकांवर आणि मालेगाव शहरात मालेगाव मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांवर हे काम सोपविले आहे. शनिवारी नाशिक शहरात २०९ रुग्णांसाठी २३४ इंजेक्शन झाले उपलब्ध झाले. नाशिक ग्रामीण भागात ४५ रुग्ण असून, ५१ इंजेक्शन वितरीत झालेत. मालेगावमध्ये १३ रुग्ण असून, १५ इंजेक्शन देण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com