30 वर्षांपासूनची बससेवा अचानक बंद ?

30 वर्षांपासूनची बससेवा अचानक बंद ?

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

पिंपळगाव (Pimpalgaon) आगार महामंडाळाची गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेली दिंडोरी- वरखेडा मार्गे पिंपळगाव जाणारी एसटी बस (ST Bus) शालेय वेळेत अचानक बंद झाल्यांने

या मार्गावरील रस्ते खराब असल्याच्या कारणास्तव बस सेवा (bus service) अनियमित असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह (students) सर्व सामान्य जनतेची गैरसोय झाली असून प्रवाशाचे हाल होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

महामंडळाची एसटी बस सेवा (ST Bus Service) दहा ते पंधरा दिवसांपासून अचानक बंंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शैक्षणिक नुकसान (Educational loss) होऊ नये व वेळेत शाळेत जाता यावे यासाठी विद्यार्थी मिळेल त्या साधनाने प्रवास करत आहे. याबाबत ग्रामपंचायत (gram panchayat) व प्रवाशांच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना वेळोवेळी लेखी निवेदन (memorandum) देवून दखल घेतली जात नाही.

एकीकडे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचे अन दुसरीकडे ये-जा करण्यासाठी बस सेवा (bus service) बंद करून प्रवासाची गैरसोय करायची. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिंडोरी, वलखेड फाटा, लखमापूर फाटा, परमोरी, वरखेडा, कादवा सहकारी साखर कारखाना, सोनजांब फाटा, बोपेगाव व खेडगाव आदी गावांतून शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, सरकारी कामे, हॉस्पिटलमध्ये उपचार, बाजारपेठा व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे.

त्यांच्यासाठी असणारी बस दहा ते पंधरा दिवसांपासून अचानक बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस सेवा नियमित सुरू करावी अशी मागणी चोर धरत असून,स्थानिक लोक प्रतिनिधी लक्ष देत नसल्याने प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांना ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर अथवा बैलगाडीतून या खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शालेय वेळेत बससेवा बंद केल्याने शालेय विद्यार्थीचे प्रंचड हाल होत आहे.

- केशव वाघले, सरपंच वरखेडा

दररोज वरखेडा येथून कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहोत. पंरतु गेल्या अनेक दिवसांपासून शालेय वेळेत पिंपळगाव येथे जाणारी बस बंद झाल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- समृध्दी गांगुर्डे, विद्यार्थी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com