जिल्हयात 30 लाखांचे होणार वृक्षारोपण

या तालुक्यात सर्वाधिक सागवानचे वृक्षारोपण
जिल्हयात 30 लाखांचे होणार वृक्षारोपणनाशिक | Nashik
जमिनीवरील वनांचे आच्छाद्न वाढविण्याकरिता (Increasing forest cover) राज्यात भाजप सेना सरकार असताना वृक्षरोपण मोहिम (Tree Plantation Campaign) हाती घेतली होती, कोरोनामुळे गेल्या वर्षी वृक्षारोपन मोहिम बाजूला ठेवण्यात आली.

दरम्यान चालू वर्षी नाशिक जिल्हयात प्रादेशिक वन विभाग व सामाजिक वनिकरण विभागाकडून (Regional Forest Department and Social Forestry Department) 31 लाखांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हयातील वसुंधरा आणखी बहरणार आहे.


नाशिक वन विभाग (Nashik forest department) प्रादेशिकमध्ये 1 हजार 174 हेक्टरमध्ये एकुण 21 लाख 6 हजार 170 रोपांची लागवड केली जाणार आहे. आत नाशिक वनवृत्त्तातील पूर्व विभागात 452 हे्नटर तर पश्चिम वनवृत्तात 310 हेक्टरवर रोपण केले जाणार आहे. यात सामाजिक वनिकरण विभागाकडून 10 लाख 30 हजारांचे रोपण होणार आहे.

विविधी जाती प्रजातीची स्थानिक रोपांची लागवड (Cultivation of local seedlings) केली जाणार आहे. आंबा, सागवान, फणस, आवळा, चिंच, जांभुळ् आदी विविध प्रकारच्या रोपांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. जिल्हयातील ज्या भागांमध्ये पर्जन्य बर्‍यापैकी आहे, तेथे वृक्षरोपण सुरु करण्यात आले आहे. मात्र जिह्यातील बहूतांश तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने समाधान कारक हजेरी न लावल्याने तेथे वन विभागाने वृक्षरोपण थांबविले आहे.

अशा ठिकाणी पाउस पडताच रोपांची लागवड केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच खड्डे खोदून सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हयात सन 2015 पासून वृक्षरोपण मोहिम राबविली जात आहे. 2020 हे वर्ष अपवाद ठरता गेल्या पाच वर्षामध्ये वन विभागाच्या माध्यमातून विविध संस्थांना सहभागी करुन घेत मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करुन घेतले. तसेच नागरिकांना वृक्षरोपण मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी कमी किंमतीमध्ये रोपे देण्याची व्यवस्था करण्यात आली.

प्रादेशिक वन विभाग व सामाजिक वनिकरण विभाग विविध योजना राबवून जास्तीत जास्त रोपण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनामुळे शासकिय यंत्रणा त्यामध्ये अडकल्याने वृक्षारोपणाला याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.


प्रादेशिक वन व सामाजिक वनिकरण विभागाकडून रोपण केले जात असताना, नाशिकच्या वनविकास महामंडळाकडून देखील लाखोंनी रोपे लावली जात आहे. नाशिक रेंजद्वारे पेठ आणि त्र्यंबक तालुक्यात तब्बल चार लाखांचे सागवान लावले जात आहे. यामुळे वृक्षारोपणामध्ये मोठी भरच पडणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com