'म्हाडा स्किममध्ये घर मिळवून देतो' म्हणत ३० लाखांना गंडा

'म्हाडा स्किममध्ये घर मिळवून देतो' म्हणत ३० लाखांना गंडा

नाशिक | Nashik

शासनाच्या म्हाडा स्किममध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्याने दांम्पत्यासह त्यांच्या परिचितांना तब्बल ३० लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

किशोर सरोदे (रा. फ्लॅट नं.१०९ हरिविश्व कारडा कन्स्ट्रक्शन,पाथर्डी फाटा) असे गंडा घालणार्‍या संशायीताचे नाव आहे. याप्रकरणी नितीन प्रभाकर भोळे (रा.मेट्रोझोन जवळ वडाळा गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.

संशयीताने १ फेब्रुवारी २०१९ ते १ मे २०२१ दरम्यान हा गंडा घातला आहे. संशयीताने भोळे यांना गाठून म्हाडा कार्यालयात आपले मोठे वजन असल्याचे भासवून हा गंडा घातला आहे. शहरात सुरू असलेल्या म्हाडा स्किममधील सदनिका विक्रीची जाहिरात तक्रारदारांना दाखवून ही फसवणुक करण्यात आली आहे.

म्हाडा मध्ये स्व:स्तात सदनिका घेवून देतो असे आमिष दाखवून संशयीताने प्रथम भोळे यांच्याकडून दोन घर घेवून देण्याच्या मोबदल्यात ९ लाख घेतले. यापाठोपाठ भोळे यांच्या मेव्हणी भावना कोल्हे यांनीही घर घेण्यासाठी संमत्ती दर्शविल्याने त्यांच्या कडूनही साडे चार लाख रूपये उकळण्यात आले.

तसेच भोळे यांचे परिचीत वंदना चौधरी, पुष्पा पवार आणि गायत्री महाले यांनीही अनुक्रमे सहा लाख, चार लाख २० हजार व ५ लाख १५ हजार रूपये संशयीताच्या स्वाधिन केले. या घटनेत २८ लाख ८५ हजार रूपयांना गंडविण्यात आले असून, बराच काळ उलटूनही घर अथवा पैसे न मिळाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com