ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यात सध्या परनॉर्ड रिकार्ड इंडिया कंपनी चर्चाचा विषय ठरली असून या कंपनीने दिंडोरी तालुक्यासाख्या आदिवासी तालुक्यात सी एस आर फंडातून ३० कोटीची विकासकामे करून खऱ्या अर्थाने अनेक गावाच्या विकासाला हातभार लावल्यांमुळे येथील गावाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली असून शासनाला सर्वात जास्त महसूल यांच कंपनीकडून देण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात कंपनीने शासनाच्या परवानगीने ८० टक्के अल्कहोल असलेले बल्क सॅनिटायझर तयार करून हे सॅनिटायझर मुंबई येथे ८ हजार लिटर, पुणे येथे ३ हजार लिटर, नाशिक येथे ४ हजार लिटर व दिंडोरी तालुक्यात ३ हजार लिटरचे वाटप करण्यात आले.

त्याप्रमाणे हे सॅनिटायझर २० ते ५० लिटरच्या ड्रम पॅकिंग करून वितरण केले तसेच २७ हजार कापडी मास्क व १० हजार हूड कव्हरचे वाटप जिल्हाअधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्रांत कार्यालय, तहसिल कार्यालय पोलिस ठाणे तसेच दिंडोरी व पेठ तालुक्यात सर्व शासकीय व प्राथमिक आरोग्य केंद्रात केले आहे.

त्यामुळे या कंपनीने आदिवासी भागातील जनतेशी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. परनॉर्ड रिकार्ड इंडिया कंपनीने तालुक्यात ८ गावाना शाळेच्या इमारतीचे बांधकाम करून दिले असून ४० गावा मधील शाळांना स्कुल टॉयलेट तालुक्यात विविध ठिकणी सिंमेट बंधारे १७, कम्युनिटी टॉयलेट ३, वॉटर एटिम २१, कम्युनिटी हॉल १, वॉटर सप्लाय २, टॅक्टर वाटप ५, डिजीटल क्लासरूम १० शाळा, संकगणक वाटप १०, जि. प.च्या १५ शाळामध्ये मुलाना विविध शालेय साहित्याचे वाटप, जि. प.च्या १७ शाळांमध्ये मुलाच्या स्पर्धा, १५००० हजार वृक्षाची विविध ठिकाणी लागवड व संगोपन करणे, ४० बंधा-यामधील गाळा काढला, वलखेंड येथे दवाखाना, २० गावामध्ये कंपनीचा फिरता दवाखाना, २० गावामध्ये प्रतिबंध धुर फवारणी, त्याप्रमाणे मागील वर्षी ६५ लाख रुपये विद्यार्थी शिष्यवृतीसाठी वाटप करण्यात आले आहे.

आशा प्रकारे परनॉर्ड रिकार्ड इंडिया कंपनीने दिंडोरी तालुक्याच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी केली असून या परिसरातील बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळाल्यामुळे मजुरांचे राहणीमान उंचवण्यास मदत झाली आहे. आता पर्यत तालुक्यातील हि एक कंपनी सोडून औद्योगिक क्षेत्रातील दुसरी एकही कंपनी तालुक्याच्या विकासासाठी पुढे आलेली नाही.