मनमाड येथे ३० बेडचे करोना सेंटर सुरु

मनमाड येथे ३० बेडचे करोना सेंटर सुरु

मनमाड । Manmad

येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेले ऑक्सिजन बेड करोना सेंटर डीसीएचसी सुरु करण्यासाठी असलेल्या सर्व अडचणी व समस्या दूर झाल्या असल्याने आता रुग्णांसाठी हे हॉस्पिटल सज्ज झाले आहे.

आजपासून (दि. २१) रोजी हॉस्पिटल सुरु झाल्याची माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली. (दि.२०) रोजी आ. कांदे यांनी हॉस्पिटलला भेट देवून पाहणी केली.

ऑक्सिजन बेड असलेल्या करोना सेंटरची शहर परिसरातील रुग्णांसाठी फार गरज होती आता हे सेंटर सुरु होणार असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ. कांदे यांनी सांगून आगामी काळात आणखी बेड वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

करोनाच्या दुसर्‍या लाटेने राज्यासह देशभरात धुमाकूळ घातला असून शहरात देखील रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे तर अनेकांचा करोनामुळे बळी गेला आहे. शहरातील परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे येथे ऑक्सिजन बेड करोना सेंटर सुरु करण्याची जोरदार मागणी सर्वच राजकीय पक्षानी केली केली होती.

त्यानंतर शासनाने रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथे 30 बेडचे ऑक्सिजन करोना सेंटर सुरु करण्याची तयारी केली. त्यासाठी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली होती मात्र गॅस सिलेंडर अभावी डीसीएचसी सेंटर सुरु करण्यास विलंब होत होता अखेर सिलेंडर सोबत, डॉक्टर, इतर स्टाफ, औषध सर्व उपब्लध झाल्यामुळे आता हे करोना सेंटर सुरु होण्यास सज्ज झाले आहे. आज आ. कांदे यांनी हॉस्पिटलला भेट देवून पाहणी केली.

डीसीएचसी सेंटर सुरु करण्यासाठी अनेक अडचणी आल्या मात्र त्याच्यावर मात केल्यामुळे आज करोना सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असल्याची माहिती आ. कांदे यांनी दिली. आता सर्व समस्या सुटल्यामुळे उद्या बुधवार दुपारी दोन वाजेपासून करोना सेंटर रुग्णांसाठी खुले होईल, असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गोविंद नरवणे, डॉ. गोरे, डॉ. मोरे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, पालिकेचे अजहर शेख, किरण पाटील आदींसह इतर अधिकारी, सेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. डीसीएचसी करोना सेंटर सुरु होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com