पेठ तालुक्यात ३ रिश्टर स्केलचा भूकंप

या गावांना बसले धक्के
पेठ तालुक्यात ३ रिश्टर स्केलचा भूकंप

पेठ | Peth

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) आसदनपाडा, आसरबारी, कोटंबी येथे सकाळी ६ वाजून ५८ मि. ५३ सेकंदानी भुकंपाचा सौम्य (Earthquake) धक्का जाणवला. जमीन थरथरल्याच्या व पाठोपाठ आवाजाने नागरीकांमध्ये काहीशी भितीची जाणीव निर्माण झाली.

दरम्यान या प्रकारास प्रशासनानेही दुजोरा दिला असुन मेरीच्या (Meri) भुकंपमापक यंत्रात ३ रिश्टर क्षमतेची (Richter magnitude scale) नोंद झाली असुन सुदैवाने कुठलीही जिवीत अथवा मालमत्तेची हानी झालेली नाही.

दरम्यान तालुक्यातील भायगाव, गोंदे, एकदरे, जामूनमाळ, हेदपाडा, कोहोर, जोगमोडी, पेठ, खोकरतळे येथेही भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहीती प्रशासनास प्राप्त झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com