अँटीजेन टेस्टसाठी कॅन्टोन्मेंटकडून 3 दिवस मुदतवाढ

अँटीजेन टेस्टसाठी कॅन्टोन्मेंटकडून 3 दिवस मुदतवाढ
File Photo

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील पेपर विक्रेत्यांसह दुकानदारांना कोरोनाची अँटीजेन चाचणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. अनेकांची टेस्ट अजूनही बाकी असल्याने पुन्हा ३ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे...

ब्रेक द चेन अंतर्गत नाशिक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या टीमने देवळालीत ३ दिवसात १२४४ लोकांची तपासणी केली आहे.

अनेकांची तपासणी अजूनही बाकी असल्याने बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याशी चर्चा करून ३ दिवस तपासणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

त्यानुसार १५ ते १७ जूनदरम्यान राहिलेल्या नागरिकांनी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री नटेश यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com