केटीएचएमच्या २९ विद्यार्थ्यांना ५ लाखांपर्यंत पॅकेज; कॅम्पसमधून निवड

केटीएचएमच्या २९ विद्यार्थ्यांना ५ लाखांपर्यंत पॅकेज; कॅम्पसमधून निवड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मविप्र समाज संचलित केटीएचएम महाविद्यालयातील (KTHM College) २९ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट (Placement) झालेली असून त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत...

महाविद्यालयाच्या वतीने आयोजित प्लेसमेंट कॅम्पसअंतर्गत (Placement Campus) टीसीएस (TCS), इंफ्फोसीस (Infosys), विप्रो (Wipro) व कॉग्निझंट (Cognizant) या पुणे (Pune), मुंबई (Mumbai) व बँगलोर (Bangalore) येथील कंपन्यांमध्ये एकूण २९ विद्यार्थ्यांची निवड झाली.

विद्यार्थ्यांचे वार्षिक वेतन २.५० ते ५.५० लाख असेल. या यशाबद्दल मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr. Tushar Shewale), सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार (Nilimatai Pawar), सभापती माणिकराव बोरस्ते (Manikrao Boraste), चिटणीस डॉ. सुनिल ढिकले (Dr. Sunil Dhikale), उपसभापती राघोनाना अहिरे (Raghonana Ahire), संचालक मंडळ शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे (Dr. D. D. Kajale) यांनी अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सहसंचालक कार्यालय प्रशासन अधिकारी डॉ. अर्चना बोऱ्हाडे (Dr. Archana Borhade) व प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड (Dr. V. B. Gaikwad) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. एन. डी. गायकवाड, संगणक विभागप्रमुख डॉ. एम. एन. शेलार, प्लेसमेंट ऑफिसर डी. बी. उफाडे, विनीत देवरे आदींनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संगणक विभागातील डी. आर. डेर्ले, के. डी. मोरे, रसायनशास्त्र विभागातील के. ए. महाले, डी. जी. बहिरम, भौतिकशास्त्र विभागातील एस. एस. बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com