पीएम किसान योजना
पीएम किसान योजना
नाशिक

पी.एम.किसान योजनेचे वर्षभरात २७८ कोटी प्राप्त

जिल्हा प्रशासन : ४ लाख ७८ हजार शेतकरी लाभार्थी

Kundan Rajput

नाशिक । Nashik

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे नाशिक जिल्ह्याला वर्षभरात तीन टप्प्यातील अनुदानाचे २७८ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील चार लाख ७८ हजार शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहे. करोना संकटात शेतकर्‍यांना हे पैसे मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

गत लोकसभा निवडणुकिपुर्वी पंतप्रधान मोदी यांनी अल्प भु धारक शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये मदत योजना सुरु केली होती. तीन टप्प्यात दोन हजार असे वर्षभरात सहा हजार रुपये जमा केले जात होते. लोकसभा निकालानंतर अल्प भु धारक ही अट रद्द करत सरसकट शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात जमा केले जात आहे.

पी.एम. किसान योजनेंतर्गत थेट ४ लाख ५८ हजार ६६७ शेतकऱ्यांच्या खात्यात २७३ कोटींची मदत वितरीत झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसुल दिनाच्या औचित्यावर सांगण्यात आले आहे. तसेच गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तसेच मध्यंतरीही झालेल्या अवकाळी आणि वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. वेळोवेळी झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ६ लाख ८२ हजार २४३ शेतकऱ्यांना तब्बल ५७८ कोटींचे वाटप महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून झाले आहे.

शासनाने आर्थिक वर्ष जरी १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान असले तरीही महसूली वर्ष मात्र १ ऑगस्ट ते ३१ जुलै या दरम्यानच साजरे केले जाते. त्यानुसार गत महसूली वर्षात जिल्हा प्रशासनाने विविध योजनांद्वारे जनतेला विविध सेवा, सुविधा पुरविल्या आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचे म्हणजे बळीराजासाठी सर्वाधिक प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

वर्षभरात जवळपास ७ लाख शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरी पणाचा फटका बसला, त्यातच नंतरच्या काळात कोरोनाचे संकट निर्माण झाले अशा परिस्थितीत पुरता बेजार झालेल्या बळीराजाला शासनाने मदतीचा हात देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. झालेल्या नुकसानीपोटी तब्बल ५७८ कोटींची मदत प्राप्त झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com