तौक्ते चक्रीवादळ : पेठ, सुरगाण्याला तडाखा; २७३ घरांची पडझड, आंबा बागा जमीनदोस्त

तौक्ते चक्रीवादळ : पेठ, सुरगाण्याला तडाखा;  २७३ घरांची पडझड, आंबा बागा जमीनदोस्त

नाशिक । प्रतिनिधी

अरबी समुद्रात आलेल्या तौत्ते चक्रिवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून २७३ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर, फळबागांमध्ये आंबा व डाळिबांच्या बागा उध्दवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यांना बसला आहे. जिल्हाप्रशासनाने युध्दपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण केले असून तातडीने हा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे....

पश्चिम किनारपट्टिवर येऊन धडकलेले तौत्ते चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदरला धडकल्यानंतर त्याचा जोर ओसरला. मात्र, सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस या चक्रिवादळाने राज्याची किनारपट्टी व लगतच्या जिल्ह्यात तांडव घातले. त्याचा जोरदार तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला आहे.

विशेषत: पश्चिम पट्टयात येणार्‍या पेठ, सुरगाणा, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात चक्रिवादळाने धुमाकूळ घातला. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर नूकसानिचे आकडे समोर येत आहे. सोसाट्याचा वारा व जोरदार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे.

सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ११२ घरांची पडझड झाली. त्या खालोखाल पेठ तालुक्यात ६५, कळवण ५६ तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३० घरांची पडझड झाली. तसेच इतर तालुक्यात अशत: घरांची पडझड, शाळा, अंगणवाड्या, समाज मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र व कांदा शेडचे पत्रे व छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या.

इतर पिके व भाजीपाल्याचे फारसे नूकसान झाले नसले तरी फळबागांना जोरदार तडाखा सहन करावा लागला. सर्वाधिक नूकसान आंबा व डाळींब बागांचे झाले. पेठ तालुक्यात २०५ हेक्टरवरील आंबा बागांचे नूकसान झाले. तब्बल दीड हजार शेतकर्‍यांना त्याचा फटका सहन करावा लागला.

त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८.८६ हेक्टरवर आंब्याचे नूकसान झाले. सिन्नर तालुक्यात डाळिंब बागांना तडाखा बसला. जिल्ह्यातील नूकसानीचा हा प्राथमिक अंदाज असला तरी प्रत्यक्षात नूकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुदैवाने जीवित व पशूधनाची हानी झाली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com