चितेवर झोकून देणाऱ्या 'त्या' मनोरुग्णाची नदीत उडी मारून आत्महत्या

चितेवर झोकून देणाऱ्या 'त्या' मनोरुग्णाची नदीत उडी मारून आत्महत्या

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) मागील काही दिवसांपूर्वी ज्या नदीत आत्महत्या करताना वाचवले होते तसेच दोन दिवसांपूर्वी एका जळत्या चितेवर रात्री अकराच्या सुमारास ज्याने चितेवर झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच व्यक्तीने आज नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे....

राकेश संजय आहिरे (वय २७) असे या आत्महत्या करणाऱ्या मनोरुग्णाचे नाव आहे. त्याने पिंपळगाव टोलनका परिसरातील कादवा नदीत उडी मारून आत्महत्या केली

अधिक माहिती अशी की, या मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीने 18 मार्च रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील कादवा नदीच्या पुलावरून ऊडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांनी वाचविले होते. त्यानंतर दि.11 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याने शहरातील अमरधाम (Amardham) येथे जळत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळीही मृताच्या नातलगांनी त्यास वाचवले. दरम्यान, आज (दि 13) रोजी कादवा नदीत (Kadava River) एका व्यक्तीचा मृतदेह सकाळी 10 वाजता तरंगताना आढळून आला होता.

पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलाने (Pimpalgaon Baswant fire dept) या व्यक्तीचा मृतदेह (deadbody) बाहेर काढला असता तो राकेश संजय आहिरे याचा असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) शव विच्छेदनास (Post Mortem) नेण्यात आले असुन या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (pimpalgaon police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.