नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील तपोवन परिरातील नदीपात्रात बुडून निफाड येथील युवकाचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि.15) सायंकाळी घडली...

बन्सी धमेंद्र वाघ (27, रा. अमोल श्वासलेन, निफाड) असे मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तपोवन परिसरातील केवडीबन येथील नदीपात्रात आढळून आला.

त्याची आत्महत्या की, बुडून मृत्यु याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लोहकरे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com