चाकूने सपासप वार करून महिलेचा निर्घृण खून

चाकूने सपासप वार करून महिलेचा निर्घृण खून

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील गुन्हेगारी (Nashik Crime) काही कमी होण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीये. नुकतीच मद्यधुंद अवस्थेत दोन मित्रांनी एकाची धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना ताजी असतानाच एका महिलेचा चाकूने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची घटना नाशिकमध्ये काल मध्यरात्री घडली. (27 year old woman murder at nashik today)

किरकोळ कारणातून धारदार चाकूने वार करत खून केल्याच्या घटनेने नाशिक हादरले आहे. हल्लेखोर जवळचा नातलग असल्याचा संशय पोलिसांना असून हल्लेखोर फरार असल्याचे समजते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (murder case registered at gangapur police station) खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पूजा संदिप आंबेकर (वय २७, रा. संत कबीरनगर, महात्मानगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा दीर गेल्या काही दिवसांपासून राहत होते.

संतोष आंबेकर (Santosh Ambekar) असे संशयिताचे नाव असून तो फरार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला असल्याचे समजते.

दरम्यान, गुरुवारी रात्री ११ वाजेदरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. राग अनावर झाल्याने संतोषने पूजावर धारदार चाकूने सपासप वार केले.

त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. ही बाब गंगापूर पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com