सिन्नरमध्ये २६ रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली ३३४ वर
नाशिक

सिन्नरमध्ये २६ रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली ३३४ वर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यात आज 17 जुलै रोजी 26 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यातील 14 रुग्ण सिन्नर (Sinnar) शहरातील असून ग्रामीण भागात नवीन 12 रुग्ण वाढले आहेत.

सिन्नर शहरात शिवाजीनगर (Shivajinagar) येथील 65 वर्षीय पुरुष, विजय नगरमधील साठ वर्षीय महिला, कानडी मळ्यातील 23 वर्षीय व 19 वर्षीय युवक, नवनाथ नगर येथील 22 वर्षीय युवक, महालक्ष्मी नगर येथे 22 वर्षीय युवक, विठ्ठलेश्वर मंदिरा जवळील 21 वर्षीय युवकाचा त्यात समावेश आहे. उज्वल नगरमध्ये आज नवे सात रुग्ण आढळले आहेत.

त्यात दोन, सहा, आठ, बारा व 14 वर्षीय मुली, 36 व 42 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे नवे चार रुग्ण सापडले आहेत. त्यात पंधरा वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, चाळीस व 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

कणकोरी येथे पुन्हा दोन रुग्ण सापडले असून त्यात 16 वर्षीय मुलगा व 18 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तालुक्यातील वारेगाव येथे 25 वर्षीय युवक, लोणारवाडी येथे 26 वर्षीय युवक तर निऱ्हाळे येथे 32 वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाला आहे.

तालुक्यातील कुंदेवाडी येथे 32 वर्षीय युवक, दोडी बुद्रुक येथे 19 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com