जिल्ह्यात अडीच हजार रूग्ण 'होम क्वारंटाईन'
नाशिक

जिल्ह्यात अडीच हजार रूग्ण 'होम क्वारंटाईन'

रोज ‍१०० पेक्षा अधिक संशयिताचा सामावेश

Khandu Jagtap

Khandu Jagtap

नाशिक | Nashik

नाशिक शहर तसेच ग्रामिण भागातून दररोज १ हजार पेक्षा जास्त करोना संशयित रूग्ण दाखल होत आहेत. यामध्ये आतापर्यंत गृहविलगीकरणातून दाखल झालेल्या संशयित रूग्णांचा आकडा अडीच हजारपेक्षा अधिक आहे.

ज्या रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. मात्र त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. अशा रूग्णांना व्यवस्था असल्यास घरीच विलगीकरण होण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा रूग्णांचा गृहविलगीकरणमध्ये सामावेश होतो. त्यांना आवश्यकतेनुसार घरीच उपचार पुरवले जात आहेत. गृहविलकीकरणास मे पासून परवानगी देण्यात आली मात्र पहिल्या महिन्यात अवघे ५ जणांनी गृहविलगिरणात परवानगी घेतली. जुनमध्ये हा आकडा सव्वाशे झाला तर जुलै महिन्यात अडीच हजाराच्या घरात पोहचली आहे.

जिल्ह्यातील नाशिक शहर, मालेगाव तसेच ग्रामिण भागातील बहूतांश तालुक्यांमध्ये करोना प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार पेक्षा अधिक झाली आहे. तर दररोज पाचशे पेक्षा अधिक रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७ हजार ७५८ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील ४१ हजार ३४२ जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

१५ हजार १९ पॉझिटिव्ह आले आहेत तर अद्याप ३ हजार १७० पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आता समुह संसर्गास सुरूवात झाल्याचे तज्ञ बोलत आहेत. यामुळे हा आकडा यापेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करोनाचे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असताना दररोज नव्याने दाखल होत असलेल्या

आकडा मात्र वाढत चालला असून दररोज एकाच दिवसात नव्याने १ हजारपेक्षा अधिक संशित रूग्ण दाखल होत आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक ग्रामिण जिल्ह्या, जिल्हा रूग्णालय, मालेगाव, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय व होम कोरोंटाईन रूग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com