नवीन नाशकात २५० किलो प्लास्टिक जप्त

नवीन नाशकात २५० किलो प्लास्टिक जप्त

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे (Solid Waste Management) नवीन नाशकात प्रतिबंधित प्लास्टिक (Plastic) वापराबाबत चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे २५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त (250 kg of Banned plastic seized) करून १६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली...

घनकचरा विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या सूचनेप्रमाणे नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई विशेष मोहीम राबविण्यात आली.

नवीन नाशकात २५० किलो प्लास्टिक जप्त
नाशिकचे माजी नगरसेवक मातोश्रीकडे रवाना

यावेळी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ३ केसेस करून १५ हजार रुपये दंड व नाल्यात कचरा टाकल्याबद्दल १ केस करून १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई, अशी एकूण १६ हजार रुपयांची कारवाई करण्यात आली.

नवीन नाशकात २५० किलो प्लास्टिक जप्त
आदित्य ठाकरेंनी बांधलेला पूल गेला वाहून; एकनाथ शिंदेंनी दिले 'हे' आदेश

कारवाईत सुमारे २५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक (Banned plastics) जप्त करण्यात आले. ही मोहिम स्वच्छता निरीक्षक बी. आर. बागुल, जितेंद्र परमार, विशाल आवारे, सुशील परमार तसेच स्वच्छता मुकादम अजय खळगे, विजय गोगलीया, अक्षय वाघ व वाहनचालक मनोज चौधरी यांनी राबविली.

नवीन नाशकात २५० किलो प्लास्टिक जप्त
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com