Nashik News : चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून २५० कोंबड्यांचा मृत्यू

Nashik News : चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून २५० कोंबड्यांचा मृत्यू

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) कावनई शिवारातील (Kawanai Shivar) मुकणे धरणालगत काल शुक्रवार (दि.२९ सप्टेंबर) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चक्रीवादळासह (Cyclone) झालेल्या पावसाने (Rain) पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून त्यातील २५० कोंबड्यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. यात सुमारे १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, कावनई येथील मुकणे धरणालगतच्या ( Mukne Dam) शेतात मिनीनाथ गुळवे यांचे पोल्ट्रीफार्म आहे. काल शुक्रवार (दि.२९ सप्टेंबर) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन धरणाच्या दिशेने चक्रीवादळ तयार झाले व जोरदार पाऊसही असल्याने हे वादळ थेट जवळच असलेल्या गुळवे यांच्या पोल्ट्री फार्मवर (Poultry Farm) आले.

यात सुरुवातीला पोल्ट्री फार्मवरील पत्रे फुटुन पोल्ट्री शेडमध्ये असलेल्या कोंबड्या (Hens) मृत्युमुखी पडल्या. शेतीस (Farm) जोडधंदा म्हणून सुरू असलेल्या पोल्ट्रीचे चक्रीवादळ व पावसामुळे गुळवे यांचे जवळपास १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या चक्रीवादळाची तीव्रता इतकी होती की, धरणातील (Dam) पाणी हे पावसाप्रमाणे हवेत उडतांना दिसत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com