एकाच कुटुंबातील २५ सदस्यांनी केली करोनावर मात
करोना अपडेट

एकाच कुटुंबातील २५ सदस्यांनी केली करोनावर मात

दिंडोरी । प्रतिनिधी

30 जणांच्यां कुटुंबात 25 जणांना करोनाची लागण झाल्यानंतर धैर्याने तोंड देत करोनावर मात करीत 25 चे 25 लोक करोना मुक्त करण्याची उल्लेखनीय घटना दिंडोरी शहरात घडली आहे.

दिंडोरी शहरातील बाळासाहेब जाधव यांंचे कुटुंब हे जिल्ह्यात नावाजलेले कुटुंब आहे. दि. 3 एप्रिल तीस जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी सहा कुटुंबीयांना ताप डोकेदुखी, अंगदुखी या करोना सदृश लक्षणांची लागण झाली. घरामध्ये डॉ. राहुल जाधव असल्याकारणाने ही करोनाची लक्षणे आहे हे त्यांच्या लक्षात आले. सर्वानी करोनाची चाचणी करून घेतली.

30 जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये 25 कुटुंबीय हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर चिंतेचे वातावरण पसरले. सगळ्यात मोठ्या आजी 87 वर्षांच्या, त्यानंतर 7 जण वयाची साठी ओलांडलेले, सर्वात लहान बाळ दीड वर्षाचे अशी भयावह स्थिती कुटुबात होती. अशा बिकट परिस्थितीत डॉ. घनश्याम जाधव यांनी धीर दिला. सनराइज् हॉस्पिटलचे डॉ. वैभव पाटील, दिंडोरीचे डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी उपचार चालू केले. होमिओपॅथिक तज्ञ डॉ.राहुल जाधव यांनी होमिओपॅथिक औषधे दिली.

प्रा . डॉ. घनश्याम जाधव त्यांच्या फार्मसी क्षेत्रातील अनुभवाचा फायदा डॉ. राहुल जाधव यांनी करुन दिला. पहिल्या सात दिवसांमध्येच कुटुंबातील बहुतांश सदस्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसून आली. सात दिवसानंतर करण्यात आलेल्या एचआरसिटी अहवालमध्ये सगळ्या कुटुंबियांचा स्कोर झिरो दिसला. सर्व कुटुंबीय दहा दिवसानंतर करोना मुक्त झाले. सर्वांनी काळजी घ्यावी व लस घेऊन करोना संसर्गही थांबवा असे आवाहन डॉ.घनश्याम जाधव, डॉ. राहुल जाधव यांनी केले आहे.

आमच्या कुटुबात सुरुवातीला 30 पैकी 25 सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर काय करावे, हे सुचत नव्हते. परंतु सर्व सदस्यांनी एकत्रित येत करोनाशी धैर्याने लढत द्यायचा निर्णय घेतला. वेळीच लक्षणे दिसता क्षणी रोग अंगावर न काढता उपचार सुरू केले. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य करोना मुक्त झाले.

बाळासाहेब जाधव, संचालक कादवा कारखाना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com