Think Positive : एकाच कुटुंबातील २५ सदस्यांनी घरी राहूनच केली 'करोना'वर मात

Think Positive : एकाच कुटुंबातील २५ सदस्यांनी घरी राहूनच केली 'करोना'वर मात

ओझे | वार्ताहर

3 एप्रिल रोजी तीस जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी सहा कुटुंबीयांना ताप डोकेदुखी अंगदुखी या करोना सदृश्य लक्षणांची लागण झाली होती...

घरामध्ये डॉक्टर असल्याकारणाने ही करोणाची लक्षणे आहेत. हे डॉक्टरांच्या लक्षात आले. लागलीच सर्व कुटुंबीयांची करोना चाचणी करून घेण्यात आली.

यामध्ये ३० जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये 25 कुटुंबीय हे पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. भय, अनिश्चितता, चिंता काळजी याचे विचारचक्र सुरु झाले होते. सगळ्यात मोठ्या आजी 87 वर्षाच्या त्यानंतर ७ जण वयाची साठी ओलांडलेले, सर्वात लहान बाळ दीड वर्षाचे अशी भयावह स्थिती होती.

अशा बिकट परिस्थितीमध्ये सर्व कुटुंब एकत्र आले. त्यांनी एकमेकांना आधार दिला. सर्व कुटुंबियांच्या रक्ताच्या तपासण्या करून डॉक्टर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांची ट्रीटमेंट सुरु करण्यात आली.

बरोबर डॉक्टर राहुल जाधव, होमिओपॅथिक तज्ञ, यांच्याकडून सर्व पेशंटसाठी होमिओपॅथिक औषधेही सुरुवात करण्यात आली होती. उत्तम आहार घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण डॉ. वैभव पाटील व डॉ. राहुल जाधव यांचे योग्य मार्गदर्शन या बरोबरच प्रा . डॉ. घनशाम जाधव त्यांच्या फार्मसी क्षेत्रात असल्या आज पर्यंतच्या अनुभवावरती डॉ. राहुल जाधवला मदत करत योग्य नियोजन करून सर्व कुटुंबाला मानसिक धीर देण्यात आला.

या भयंकर करोनाच्या संकटामधून सर्वाना आजारापासून मुक्त केले. पहिल्या सात दिवसांमध्येच कुटुंबातील बहुतांश सदस्यांची तब्येतीमध्ये सुधारणा दिसून आली. सात दिवसानंतर करण्यात आलेल्या एच आर सिटी रिपोर्ट मध्ये सगळ्या कुटुंबियांचा स्कोर झिरोवर आला होता. सर्व कुटुंबीय दहा दिवसानंतर करोनामुक्त झाल्यामुळे सकारात्मक विचार या आजारात किती गरजेचे आहेत त्याचा प्रत्यय आला.

आम्ही असे काय केले?

1) टेस्टला घाबरलो नाही विनाविलंब टेस्ट केल्या लवकरात लवकर निदान केले.

2) करोनामध्ये पहिले पाच ते सात दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात ह्या दरम्यान जर आजार लक्षात आला त्यावर योग्य उपचार झाले तर बऱ्यापैकी पेशंटला पहिल्या सात दिवसांमध्ये फरक पडून जातो व त्याला होणारे पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात...

3) करोनामध्ये प्रतिकार शक्ती किंवा स्वतःची चेतना शक्ती याचा फार मोठा वाटा असतो. बरोबर होमिओपॅथिक औषधे चालू केल्यामुळे सगळ्या कुटुंबियांचे प्रतिकारशक्तीही अबाधित राहिली व त्यामुळे ते लवकरात लवकर बरे होऊ शकले.

4) होमिओपॅथी ऍलोपॅथी या युद्धामध्ये न पडता दोन्हीही पाच इंची औषधांची स्वीकारणं केली दोन्ही औषध चालू ठेवले डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे 87 वर्षांच्या आजींनी सुद्धा करोणा वर मात केली.

5) होमिओपॅथिक औषधे नियमितपणे घेतल्यामुळे कुठल्याही पेशंटला निमोनियाची लागण झाली नाही. प्रतिकारशक्‍ती चांगली राहिल्यामुळे ॲलोपॅथी व होमिओपॅथी या दोन्ही औषधांच्या मदतीने कुटुंबाची लवकरात लवकर करोणाच्या विळख्यातुन मुक्तता झाली.

6) आश्चर्याची बाब म्हणजे 25 पेशन्स पैकी फक्त सात जणांना औषधाची गरज पडली.

7) लसीकरणाचा ही फायदा होताना दिसतोय घरातली 5 सीनियर कुटुंबीय यांनी एक महिन्यापूर्वी लसीकरणाचा पहिला डोस घेतला घेतलेला होता. त्यामुळे आपणही सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com