नाशिक | रवींद्र केडिया

कृषी क्षेत्रानंतर बांधकाम क्षेत्र हे देशातील दुसर्या क्रमांकावर असंघटीत क्षेत्राला रोजगार देणारा उद्योग आहे. क्रेडाईने आपल्या बांधकाम कर्मचार्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असल्याने कामगार क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

क्रेडाई (कॉन्फडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स) ही देशातल्या 21 राज्यांतील 1300 पेक्षा जास्त रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना आहे. त्याच्या अध्यक्षपदी नुकतेच हर्षवर्धन पटोडिया यांची निवड झाली आहे.

अध्यक्षपदावर निवड होताच हर्षवर्धन पटोडिया यांनी मंगळवारी क्रेडाई कडून देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचार्यांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना असलेल्या क्रेडाईनेे आता देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचार्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

बांधकाम क्षेत्र हे देशातले कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे दुसर्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे क्रेडाई चा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

या घोषणेच्या माध्यमातून क्रेडाईकडून देशात केंद्र सरकारने सुरु केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेला जलदता देणे आणि देशातल्या गरजू लोकांना कोरोनाची लस देऊन कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावण्यात येणार असल्याचं पाटोडीया यांनी सांगितलें.

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 16 जानेवारीला सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी केवळ 60 वर्षावरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण नोंदणी करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारी 1977 नंतर जन्मलेले नागरिकही यात नोंदणी करू शकतील असे स्पष्ट केले आहे.